अॅडलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा दारूण पराभव झाला. क्रिकेट इतिहासात भारतीय टीम निच्चांकी स्कोअरवर आऊट झाली. पहिल्या इनिंगमध्ये ५३ रनची आघाडी घेतल्यानंतर दुस-या इनिंगमध्ये भारताचा अवघ्या ३६ रनवर ऑल आऊट झाला. या पराभवानंतर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली याच्याकडे बोलण्यासाठी शब्दही नव्हते.
मॅच संपल्यानंतर विराट कोहली याला या पराभवाची समीक्षा करायला सांगितले, तेव्हा याबद्दल बोलायला माझ्याकडे शब्दही नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली. ‘मला काय वाटत आहे, हे मी सांगू शकत नाही. आम्ही मैदानात उतरलो होतो, तेव्हा आमच्याकडे ६० पेक्षा जास्त रनची आघाडी होती, यानंतर टीम पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. आम्ही दोन दिवस चांगले क्रिकेट खेळलो, पण एका तासात मॅच गमावली. या पराभामुळे खूप दु:ख झाले आहे, असे विराट म्हणाला.
विराटने पराभवाबाबत बॅट्मनना दोष दिला. ‘बॅट्समननी रन काढण्याची जिद्दच दाखवली नाही. ऑस्ट्रेलियाच्या बॉलरनी पहिल्या इनिंगसारखीच बॉलिंग केली, पण पहिल्या इनिंगमध्ये आमचे लक्ष्य काहीही करून रन करणे हे होते. ऑस्ट्रेलियाने चांगली बॉलिंग केली, पण खेळपट्टीवर असे काही झाले नाही, ज्यामुळे एवढी वाईट कामगिरी झाली. कमी जिद्द आणि ऑस्ट्रेलियाच्या चांगल्या बॉलिंगमुळे आम्हाला सामना गमवावा लागला, असे वक्तव्य विराटने केले.
पहिल्या टेस्टमध्ये पराभव झाल्यानंतर विराटने टेस्ट सीरिजमध्ये पुनरागमनाचा विश्वास दर्शवला आहे. पुढच्या टेस्टमध्ये भारतीय टीम पलटवार करेल, अशी माझी अपेक्षा आहे. बॉक्सिंग डे टेस्टचा निकाल आमच्या बाजूने असेल, असे विराट म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौ-यातल्या उरलेल्या तिन्ही टेस्ट मॅचचे नेतृत्व अजिंक्य राहाणे करणार आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा बाळाला जन्म देणार असल्यामुळे तो दौरा अर्धवट सोडून भारतात परतणार आहे.
शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार