18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडायापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही

यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही

एकमत ऑनलाईन

शारजा : आरसीबीला सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि कर्णधार कोहलीच्या कारकीर्दीवर मोठा ठपका पडला. त्यामुळे आक्रमक असलेला विराट पराभव झाल्यानंतर चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. होते. भावनेच्या भरात विराटने यावेळी काही गोष्टींचा उलगडा केला आहे.

सामना संपल्यावर विराट म्हणाला की, आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी आरसीबीचा कर्णधार नसलो तरी संघाबरोबर एक खेळाडू म्हणून नक्कीच कायम असेन. हा सामना सुरू होण्यापूर्वी विराटकडून एक मोठी चूक घडल्याचे पाहायला मिळाले.

केकेआरविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आतापर्यंतचे कोलकाता संघाचे यूएईमधील रेकॉर्ड पाहिले तर त्यांनी इथे एकही सामना धावांचा पाठलाग करताना गमावलेला नाही. त्याचबरोबर आरसीबीचा संघ हा आतापर्यंत धावांचा पाठलाग यशस्वीपणे करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे कोहलीचा हा निर्णय दोन्ही बाजूंनी चुकल्याचेच पाहायला मिळाले आहे.

कोहली मैदानात का भडकला
आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात कोलकाताचा राहुल त्रिपाठी अपयशी ठरला आणि चेंडू त्याच्या पॅडला लागला. त्यावेळी चहलसह आरसीबीच्या संघाने जोरदार अपील केले. पण मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी तिस-या पंचांनी पाहिलेल्या रिप्लेमध्ये राहुल हा बाद असल्याचे दिसत होते. तिथेच खरंतर सर्वकाही संपले होते. पण कोहलीचा पारा तेव्हा चांगलाच चढलेला त्यावेळी तो मैदानातील पंचांकडे गेला आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या