24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाआयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर

आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी जाहीर

वनडे मालिकेतील शानदार कामगिरीने हार्दिक पांड्याला फायदा, तर रोहित २ क्रमांकावर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांंच्या दरम्यानच्या मर्यादित षटकांच्या मालिका संपल्यानंतर आयसीसीने नव्या क्रमवारी जाहीर केल्या आहेत. बुधवारी (९ डिसेंबर) टी२० क्रमवारी जाहीर झाल्यानंतर, गुरुवारी (१० डिसेंबर) आयसीसीने खेळाडूंच्या वनडे क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारत-ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत खेळलेल्या ब-याच खेळाडूंना फायदा झाला. यामध्ये हार्दिक पांड्याचाही समावेश आहे, तर या मालिकेत सहभागी न झालेला भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा आपल्या जागी कायम आहे.

आयसीसीने जाहीर केली खेळाडूंची क्रमवारी
आज (१० डिसेंबर) आयसीसीने वनडे खेळाडूंच्या क्रमवारीची घोषणा केली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान झालेल्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत सहभागी असलेल्या जवळपास सर्वच खेळाडूंना या क्रमवारीत फायदा झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली याने मालिकेत दोन अर्धशतके झळकावत आपले अव्वल स्थान अबाधित राखले. दुखापतीमुळे या मालिकेत न खेळलेला भारताचा नियमित उपकर्णधार रोहित शर्मा देखील आपल्या दुस-या स्थानावर मजबुतीने उभा आहे. मालिकेत ११४, ६० व ७५ धावांच्या खेळी करणा-या ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचवे स्थान काबीज केले.

या खेळाडूंनाही झाला फायदा
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शतके झळकावून मालिकावीर पुरस्कार जिंकणा-या स्टीव्ह स्मिथने २०१८ नंतर पहिल्यांदाच अव्वल २० मध्ये जागा मिळवली. त्याने १५ वे स्थान पटकावले. भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या कारकिर्दीत प्रथमच पहिल्या ५० मध्ये आला. त्याने मालिकेत दोन ९०+ धावांच्या खेळी केल्या होत्या. दोन अर्धशतके झळकावणारा ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल हादेखील पहिल्या २० मध्ये पोहोचला आहे.

झाम्पाने मारली क्रमवारीत उडी
फलंदाजांनी गाजवलेल्या या मालिकेत ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अ‍ॅडम झाम्पाने चांगली कामगिरी करताना ७ बळी मिळवले होते. या कामगिरीच्या जोरावर, त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम १४ वे स्थान मिळवले. मालिकेत विराट कोहलीला तीनदा बाद करणारा वेगवान गोलंदाज जॉश हेजलवूड सहाव्या स्थानी आला आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट, अफगाणिस्तानचा मुजीब उर-रहमान व भारताचा जसप्रीत बुमराह पहिल्या तीन स्थानी कायम आहेत.

व्हिडिओ लिंक ब्लॅकमेलचे सापळे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या