27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाभारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका २० सप्टेंबरपासून

भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका २० सप्टेंबरपासून

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना २० सप्टेंबर रोजी मोहाली येथे होणार आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर २३ सप्टेंबरला दोन्ही संघ नागपूरमध्ये भिडतील. शेवटचा सामना २५ सप्टेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. तिन्ही सामने संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होतील. सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी नाणेफेक होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा संघ तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी गुरुवारी भारतात दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मोहालीत तयारी सुरू केली आहे. भारतीय संघ शनिवारपासून येथे तयारीला सुरुवात करणार आहे. टी-२० विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची मानली जात आहे. विशेष करून भारतासाठी. आशिया चषक २०२२ मधील पराभवानंतर भारतीय संघ या मालिकेत परिपूर्ण प्लेईंग-११ शोधण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघ :
रोहित शर्मा, के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, यझुवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलियन संघ :
अ‍ॅरॉन फिंच (कॅप्टन), पॅट कमिन्स (उप-कर्णधार), टिम डेविड, एगर, जोश हेजलवुड, जोस इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क्स स्टॉयनिश, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या