29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeक्रीडापाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा

पाकिस्तानच्या विजयाचा भारताला फायदा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियावर ६ विकेटने विजय साकारला आणि टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशा फरकाने खिशात घातली. या मालिका विजयामुळे भारतीय संघाने आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील पहिले स्थान आणखी बळकट केले आहे. भारत २६८ रेटिंगसह पहिल्या स्थानावर असून इंग्लंडचा संघ २६१ गुणांसह दुस-या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये आता सात रेटिंगचा फरक झाला आहे.

भारतीय संघासमोर आता दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. या मालिकेत विजय साकारल्यास टीम इंडियाला पहिले स्थान आणखीन बळकट करता येणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या तिस-या स्थानावर आहे. आगामी मालिकेत भारतीय संघावर विजय मिळवल्यास त्यांना टी-२० क्रमवारीत आगेकूच करता येणार आहे.

पाकिस्तानला संधी
पाकिस्तान-इंग्लंड यांच्यामध्ये आतापर्यंत सातपैकी चार टी-२० लढती झालेल्या आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी २ लढती ंिजकल्या आहेत. पाकिस्तानने चौथी लढत जिंकल्यामुळे भारतीय संघाला पहिल्या स्थानासाठी आणखी बळकटी मिळाली आहे.उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवल्यास पाकिस्तानला क्रमवारीत पुढे वाटचाल करता येईल. एका लढतीत विजय साकारल्यास इंग्लंडला दुस-या स्थानावर कायम राहता येईल. दरम्यान, भारतीय संघाविरुद्ध पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाची क्रमवारीत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. विश्­वकरंडकाआधी त्यांना सहा लढती खेळावयाच्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या