28.4 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडाभारताने दक्षिण आफ्रिकेला ९९ धावांवर गुंडाळले

भारताने दक्षिण आफ्रिकेला ९९ धावांवर गुंडाळले

एकमत ऑनलाईन

दिल्ली : भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या आणि निर्णयक सामन्यात धावात गुंडाळत सामन्यावर भारताची पकड मजबूत करीत सर्वबाद ९९ धावांवर गुंडाळले. भारताच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी पोषक खेळपट्टीचा चांगला फायदा उचलला. भारताकडून कुलदीप यादवने ४ तर शाहबाज अहदम, वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या. आफ्रिकेकडून क्लासेननने सर्वाधिक ३४ धावा केल्या.

पावसाच्या छायेखाली सुरू झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय वॉशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजने क्विंटन डिकॉक (६) आणि जानेमान मलानला (१५) स्वस्तात बाद करत सार्थ ठरवला.

दोन्ही सलामीवीर स्वस्तात माघारी गेल्यानंतर गेल्या सामन्यातील हिरो रीझा हेंड्रिक्स आणि एडेन माक्ररम यांनी सावध फलंदाजी करण्यास सुरूवात केली. मात्र सिराजने हेंड्रिक्सला ३ धावांवर बाद करत आफ्रिकेला तिसरा धक्का दिला. सिराजने शॉर्टबॉलचा हुशारीने वापर करत आधी मलान आणि नंतर हेंड्रिक्सला बाद केले. त्यानंतर शाहबाज अहमदने माक्ररमला ९ धावांवर बाद करत चौथा धक्का दिला.

दक्षिण आफ्रिकेची अवस्था ४ बाद ४३ धावा अशी झाली होती. काळजीवाहू कर्णधार डेव्हिड मिलर क्रिजवर आला. मात्र वॉशिंग्टन सुंदरने त्याला ७ धावांवर त्रिफळा उडवत मालिकेत नाबाद राहण्याची मिलरची परंपरा खंडित केली. आफ्रिकेचा निम्मा संघ ६६ धावात माघारी गेल्यानंंतर कुलदीप यादवने फेलुकवायोला ५ धावांवर बाद करत आफ्रिकेचा पाय अजूनच खोलात नेला. त्यानंतर शाहबाज अहमदने हैनरिच क्लासेननची ३४ धावांची झुंजार खेळी संपवत आफ्रिकेची अवस्था ७ बाद ९३ धावा अशी केली.

यानंतर कुलदीप यादवने २६ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर फॉर्ट्युनला १ धावेवर बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर एर्निच नॉर्त्जेचा शुन्यावर त्रिफळा उडवला. कुलदीप यादव हॅटट्रिक चान्सवर होता. एन्गिडीने कुलदीपचा पुढचा चेंडू अडवला आणि हॅटट्रिक चान्स हुकला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या