25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeक्रीडाभारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली

भारत हे माझे दुसरे घर : ब्रेट ली

एकमत ऑनलाईन

मुंबई : पॅट कमिन्सनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली भारतीयांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे. ब्रेट लीने भारतातील रुग्णालयात ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी १ बिटकॉईन (४२ लाख रुपये) दान केले आहेत. तत्पूर्वी, आयपीएल २०२१ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळणारा ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने देखील भारतीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी पीएम केअर्स फंड मध्ये ५०,००० डॉलर्स (३७ लाख) दान दिले. यावेळी कमिन्सने सहकारी खेळाडूंनाही दान देण्याचे आवाहन केले.

एका निवेदनात ब्रेट ली म्हणाला, भारत हे माझे दुसरे घर आहे. माझ्या क्रिकेट कारकीर्दीत येथील लोकांकडून मला मिळालेले प्रेम आणि निवृत्तीनंतर माझ्या हृदयात याचे एक विशेष स्थान आहे. या संकटात लोकांना मरताना पाहून दु:ख होते आहे. त्यांना मदत करण्यासाठी हे थोडेसे योगदान देण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे. मी एक बिटकॉईन दान करीत आहे आणि त्याच्या माध्यमातून भारतातील विविध रुग्णालयांत ऑक्सिजन पुरविला जाईल.

राज्यांना कोविशिल्ड ३०० रुपयांना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या