बर्मिंगहॅम : येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या कसोटी सामन्यावर भारताने मजबूत पकड मिळवली आहे. तिस-या दिवसअखेर भारताकडे तब्बल २५७ धावांची आघाडी आहे. तिस-या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा चेतेश्वर पुजारा ५० आणि ऋषभ पंत ३० धावांवर खेळत होते. दरम्यान, मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहच्या भेदक मा-यापुढे इंग्लंडचा पहिला डाव ६१.१ षटकांत २८४ धावांत संपुष्टात आला. त्यामुळे पहिल्या डावात भारताला १३२ धावांची आघाडी मिळाली होती.
भारताची दुस-या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल स्वस्तात माघारी परतला. गिल ४ धावा करून अँडरसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर पुजारा आणि हनुमा विहारीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण पुजारा ११ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली २० धावा काढून बाद झाला. विराट कोहलीला स्टोक्सने तर विहारीला स्टुअर्ट ब्रॉडने बाद केले. चेतेश्वर पुजाराने एका बाजूला संयमी फलंदाजी केली. चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी केली. दिवसअखेर ऋषभ पंत 30 धावांवर खेळत आहे.
दरम्यान, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ ६१.१ षटकांत २८४ धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने १३२ धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकी खेळीच्या बळावर ४१ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला.