34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeक्रीडाभारताने उधळला विजयाचा रंग; एकदिवसीय मालिकाही खिशात

भारताने उधळला विजयाचा रंग; एकदिवसीय मालिकाही खिशात

एकमत ऑनलाईन

पुणे : पुण्यात आज झालेल्या तिस-या आणि अखेरच्या अत्यंत चुरशीच्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडला ७ धावांनी नमवत २-१ ने मालिका खिशात घातली. एकवेळ विजय इंग्लंडच्या टप्प्यात होता. मात्र, अखेरच्या क्षणी टिच्चून गोलंदाजी करीत निर्धारित षटकांत इंग्लंडला ३२२ धावांतच रोखले. त्यामुळे भारतीय संघाला विजयाचे रंग उधळता आले.

येथील गहुंजे मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकी योगदानामुळे इंग्लंडसमोर ३३० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या संघाने ३२२ धावांपर्यंत मजल मारली. सुरुवातीची फळी ढासळल्यानंतर सॅम करन भारतासमोर उभा राहिला. त्याने नाबाद ९५ धावा करत टीम इंडियाचे टेन्शन वाढवले. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या षटकात १४ धावांची गरज होती. मात्र, यॉर्कर स्पेशालिस्ट टी. नटराजनने या षटकात अवघ्या ६ धावा दिल्या. त्यामुळे भारताला विजय मिळवता आला. भारताने इंग्लंडच्या संघाला सुरुवातीपासूनच धक्के दिले. परंतु अखेरच्या टप्प्यात सॅम करनने फटकेबाजी चालू ठेवत विजयाच्या समिप आणले होते. मात्र, अखेरच्या दोन षटकांत सामना भारताच्या बाजूने झुकला आणि ७ धावांनी विजय मिळवत भारताने एकदिवसीय मालिकाही खिशात घातली. विशेष म्हणजे या अगोदर टी-ट्वेंटी मालिका आणि कसोटी मालिकेतही भारताने विजय मिळविला होता. त्यामुळे या दौ-यात इंग्लंडला सपाटून मार खावा लागला.

रंगोत्सवावर कोरोनाचे सावट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या