21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव

एकमत ऑनलाईन

राष्ट्रकुल महिला टी-२०

बर्मिंगहॅम : राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिल्या महिला क्रिकेट टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा तीन विकेट्सनी पराभव केला. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १५५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने ७ फलंदाजांच्या मोबदल्यात १९ षटकात पार केले.

ऑस्ट्रेलियाकडून अ‍ॅश्लेघ गार्डनेरने नाबाद ५२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तिला २० चेंडूत ३७ धावा करून ग्रेस हॅरिसने चांगली साथ दिली. भारताकडून रेणुका सिंहने ४ तर दिप्ती शर्माने २ विकेट घेत चांगली झुंज दिली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या