27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाभारताला विजयासाठी १८७ धावांची गरज

भारताला विजयासाठी १८७ धावांची गरज

एकमत ऑनलाईन

हैदराबाद : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सुरु असलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारतासमोर १८७ धावाचं लक्ष्य ठेवले आहे. नाणफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर कॅमेरून ग्रीनने (२१ चेंडू ५२ धावा) संघाला दमदार सुरूवात करून दिली. परंतु, भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्यानं चौथ्या षटकात आरोन फिंचच्या रुपात ऑस्ट्रेलियाला संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर पाचव्या षटकातील अखेरच्या चेंडूत भुवनेश्वर कुमारनं कॅमेरूनला आपल्या जाळ्यात अडकवत ऑस्ट्रेलियाच्या संघाला बॅकफूटवर ढकललं. परंतु, अखेरच्या काही षटकात तडाखेबाज फलंदाज टीम डेव्हिड आणि डॅनियस सॅम्सनं फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला सन्माननीय धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं चांगली उत्कृष्ट गोलंदाजी केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची चांगली सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर कॅमेरून ग्रीन आणि आरोन फिंचनं पहिल्या तीन षटकात १० च्या सरासरीन धावसंख्या ३० च्या पुढं नेली. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ४४ वर असताना आरोन फिंच बाद झाला. मात्र, त्यानंतरही कॅमेरून ग्रीननं आक्रमक खेळी सुरुच ठेवली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील पाचव्या षटकातील अखेरच्या षटकात भुवनेश्वर कुमारनं कॅमरूनला बाद करून भारताला दुसरी विकेट्स मिळवून दिली. स्टीव्ह स्मिथ (१० चेंडू ९ धावा), ग्लेन मॅक्सवेल (११ चेंडू ६ धावा), जोश इंग्लिस (२२ चेंडू २४ धावा), मॅथ्यूवेड (०) स्वस्तात माघारी परतले. मात्र, अखेरच्या काही षटकात टीम डेव्हिड आणि डॅनियल सॅम्सनं जोरदार फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला १८७ धावसंख्येपर्यंत पोहचवलं. भारताकडून अक्षर पटेलनं सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स प्राप्त झाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या