32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home क्रीडा भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज

भारताला विजयासाठी ३८१ धावांची गरज

दुस-या डावात ३९/१ ; इंग्लंड दुसरा डाव १७८/१०

एकमत ऑनलाईन

चेन्नई: इंग्लंड संघाने दिलेल्या ४२० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली़चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाने एका गड्याच्या मोबदल्यात ३९ धावांपर्यंत मजल मारली आहे. तिस-या सत्रात रोहित शर्मा अवघ्या १२ धावांवर बाद झाला. चौथ्या दिवसअखेर भारतीय संघाला विजयासाठी अद्याप ३८१ धावांची गरज आहे. अखेरच्या दिवशी भारतीय संघाला ९० षटकांमध्ये ३८१ धावा करायच्या आहेत. तर इंग्लंड संघाला ऐतिहासिक विजयासाठी ९ गडी बाद करावे लागतील. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा शुबमन गिल १५ आणि पुजारा १२ धावांवर नाबाद होते. भारतीय संघ सामना

विजयाच्या दिशेने पावले उचलण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत पोहचला आहे.
चेन्नई येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघानं पहिल्या डावातील मोठ्या आघाडीच्या बळावर भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांचे आव्हान दिले आहे. पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी असतानाही इंग्लंड संघाने फॉलोऑन न देता दुस-या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुस-या डावांत भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत इंग्लंड संघाला १७८ धावांवर रोखले. दोन्ही डावांत इंग्लंड संघाकडे ४१९ धावांची आघाडी आहे. भारतीय संघाला विजयासाठी ४२० धावांची आवशकता आहे. दुस-या डावात फिरकीपटू आर. अश्विनने सर्वाधिक ६ बळी घेतले. नदीमने २ तर बुमराह आणि इशांत शर्मा यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

चौथ्या दिवशी भारतीय संघाला ३३७ धावांवर रोखल्यानंतर इंग्लंड संघाने २४१ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने पहिल्या डावांत ५७८ धावांचा डोंगर उभा केला होता. दुस-या डावाच्या पहिल्याच चेंडूवर बर्न्स शून्यावर बाद झाला. त्यानंतर डॉम सिबली (१६), डॅन लॉरेन्स (१८), बेन स्टोक्स (७) आणि जो रूट (४०) एकापाठोपाठ एक फटकेबाजी करण्याच्या नादात बाद झाले. कोहली, पुजारा आणि रहाणे यांच्या फलंदाजीवर भारतीय संघाच्या विजयाची मदार आहे.

अश्वीनने मोडला अनेक दशकांपूर्वीचा विक्रम
दुस-या डावाच्या पहिल्याच चेंडूवर अश्विनने इंग्लंडला धक्का दिला. अश्विनने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज रोरी बर्न्स याला रहाणेकरवी झेलबाद केले़ दुस-या डावात पहिल्याच चेंडूवर बळी घेत ११४ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला.कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मागील ११४ वर्षांत डावाच्या पहिल्याच चेंडूवर एकाही फिरकी गोलंदाजाला बळी घेता आला नव्हता. पण चेन्नई कसोटी अश्विन याने पहिल्या चेंडूवर बळी घेत विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी १८८८मध्ये इंग्लंडच्या बॉबी पील यांनी ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅलेक बेन्नेर्मनला बाद करून प्रथम हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९०७मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या अल्बर्ट व्होग्लर यानी इंग्लंडच्या टॉम हेयबर्ड यांना बाद केले. त्यानंतर तब्बल ११४ वर्षानंतर अश्विनने हा मान पटकावला.

इशांतची ऐतिहासिक कामगिरी
दुस-या डावांत गोलंदाजी करताना इशांत शर्माने लॉरेन्सला बाद करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. इंग्लंडविरोधातील मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी इशांतच्या नावावर ९७ कसोटी सामन्यात २९७ बळींची नोंद होती. चेन्नई कसोटी सामन्यातील पिहल्या डावात इशांत शर्मानं दोन बळी घेतले. तर दुस-या डावाच्या सुरुवातीला विकेट मिळवत ३०० बळींचा पल्ला पार केला आहे. इशांत शर्मानं ९८ व्या कसोटी सामन्यात ३०० बळी घेतेले आहेत. इशांत शर्माआधी कपिल देव आणि झहीर खान या दिग्गजांनी कसोटी सामन्यात ३०० बळी घेतले आहेत.

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात बैठकीदरम्यान मोठा वाद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या