21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाटी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाक भिडणार

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत-पाक भिडणार

एकमत ऑनलाईन

ओमान : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी गटांची घोषणा केली आहे. ओमानमध्ये शुक्रवारी कोणत्या गटात कोणते संघ असणार, हे निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी एकाच गटात आहेत. दोघेही सुपर १२ च्या ग्रुप गट-२ मध्ये आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ भिडणार आहेत. या अगोदर २०१९ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ आमनेसामने आले होते. यात भारताने विजय मिळवला होता.

कोरोनामुळे टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान भारताऐवजी यूएई आणि ओमान येथे खेळला जाईल. ओमानमधील बैठकीत आयसीसीच्या अधिका-यांसह बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनीही भाग घेतला. टी-२० वर्ल्डकपचे सामन्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. ओमान आणि यूएई येथे खेळल्या जाणा-या या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत ८ पात्र संघ सहभागी होणार आहेत. यातील ४ संघ सुपर १२ फेरी गाठतील. प्राथमिक फेरीतील ८ संघांमध्ये बांगलादेश, श्रीलंका, आयर्लंड, नेदरलँड्स, स्कॉटलंड, नामीबिया, ओमान आणि पापुआ न्यूगिनी यांचा समावेश आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला होणार आहे.

कायद्याची गरज अन् गैरवापर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या