18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाभारत-पाक सामन्याची चाहत्यांना उत्सुकता

भारत-पाक सामन्याची चाहत्यांना उत्सुकता

एकमत ऑनलाईन

मुंबई : विश्वचषकापूर्वी एक चांगली बातमी समोर आली आहे. ही बातमी भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांसाठी खूपच आनंद देणारी आहे, कारण, आयसीसी आणि स्पर्धेचे यजमान बीसीसीआयने स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला आहे. याचा अर्थ असा की, टी -२० विश्वचषकाचे सामने शांततेत, प्रेक्षकांविना खेळवले जाणार नाहीत, तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. यूएई आणि ओमान येथे होणा-या आयसीसी टी-२० विश्वचषकातील सामन्यांच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरू करण्यात आली होती. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की, तिकीटविक्रीसाठी विंडो ओपन होताच अवघ्या तासाभरात सर्व तिकिटे विकली गेली आहेत. २४ ऑक्टोबर रोजी खेळवल्या जाणा-या सामन्याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

कर्णधार म्हणून कोहलीची शेवटची स्पर्धा
दुबईच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील. या सामन्यासह, दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी या स्पर्धेतीत त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील. विश्वचषकासारख्या मोठ्या मंचावर, भारताचा संघ आजपर्यंत पाकिस्तानकडून कधीही हरला नाही आणि त्यांचा तोच विक्रम कायम राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरेल. टी-२० कर्णधार म्हणून टीम इंडियासाठी विराट कोहलीची ही शेवटची स्पर्धा असेल. म्हणूनच, त्याने आणि टीम इंडियाने पाकिस्तानला पुन्हा एकदा धूळ चारण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षक
आयसीसीने म्हटले आहे की, यूएई आणि ओमानमध्ये होणा-या टी-२० विश्वचषकासाठी स्टेडियममध्ये ७० टक्के प्रेक्षकांना परवानगी असेल. यासह, तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू झाली आहे. आयसीसीच्या या मेगा इव्हेंटमध्ये सुपर १२ स्टेजचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या