24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाकॉमेंट्री बॉक्समध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

कॉमेंट्री बॉक्समध्येही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : बहुप्रतिक्षित आशिया कप २०२२ स्पर्धेला २७ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून स्पर्धेच्या दुस-याच दिवशी सर्वात बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान सामना मैदानात रंगणार असून यंदाच्या आशिया कपमध्ये कॉमेन्ट्री बॉक्समध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे.

कारण यंदा कॉमेन्ट्री करण्यासाठी भारताचे माजी कोच रवी शास्त्री, माजी खेळाडू गौतम गंभीर तसंच पाकिस्तानचे माजी खेळाडू वसीम अकरम, वकार युनुस यासारखे दिग्गज असणार आहेत. त्यामुळे कॉमेन्ट्री बॉक्समध्येही अगदी चुरस पाहायला मिळणार हे नक्की. आशिया कपमध्ये हिंदी, इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री पार पडणार आहे.

आशिया कपसाठी हिंदी समालोचक
संजय मांजरेकर, रवी शास्त्री, गौतम गंभीर, आकाश चोप्रा, जतिन सप्रू, संजय बांगर, दीप दासगुप्ता आणि इरफान पठान.

आशिया कपसाठी इंग्रजी समालोचक
रवी शास्त्री, इरफान पठान, गौतम गंभीर, रसेल अर्नाल्ड, दीप दासगुप्ता, स्कॉट स्टायरिस, संजय मांजरेकर, वसीम अकरम, वकार यूनुस, अतहर अली खान

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या सर्व तिकिट्सची विक्री
आशियाई क्रिकेट परिषदेनं ट्विटरच्या माध्यमातून तिकीट बुकिंगची तारीख जाहीर केली.ज्याद्वारे क्रिकेट प्रेमींना तिकीट बुक करता येईल. महत्वाचं म्हणजे, १५ ऑगस्टपासून तिकीट विक्रीला सुरू होणार होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची चाहत्यांना प्रतिक्षा असल्याने भारत आणि पाकिस्तान सामन्यांच्या तिकिटांना नेहमीच जास्त मागणी असते. पण २३ऑक्टोबर रोजी एमसीजी येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आगामी टी-२० विश्वचषक सामन्यासाठी सर्व तिकिटे आधीच विकली गेली आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या