मुंबई : दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बलराम यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तुलसीदास बलराम यांच्या निधनाने क्रिडा जगतावर शोककळा पसरली आहे.
तुलसीदास बलराम यांचे मल्टीपल ऑर्गन फेलिअर झाल्याने निधन झाले आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तुलसीदास बलराम यांना डिसेंबर महिन्यामध्ये पोट आणि लघवी संबंधित समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.