25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडाभारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव; ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच नाच्चकी

भारतीय हॉकी संघाचा दारुण पराभव; ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच नाच्चकी

एकमत ऑनलाईन

टोकियो : जपानची राजधानी टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाचा दारुण पराभव झाला. ग्रुप एमधील दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा ७-१ ने धुव्वा उडवला. भारताचा ऑलिम्पिक इतिहासातील हा लाजिरवाणा पराभव आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ सुरुवातीपासून आक्रमक खेळी करताना दिसला, तर भारतीय संघाची बचाव फळी कमकुवत दिसली. त्यातूनच भारतीय संघाला दबावात येत नामुष्कीजनक पराभवाचा सामना करावा लागला. आता स्पर्धेतील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी भारताला पुढील तीनही सामने जिंकावे लागणार आहेत.

सामन्याच्या पहिल्या दहा मिनिटातच ऑस्ट्रेलियाने १-० ने आघाडी घेतली. त्यानंतर २१ व्या आणि २३ व्या मिनिटाला एका पाठोपाठ एक दोन गोल झळकावले. त्यानंतर भारतीय संघ पूर्णपणे दबावाखाली आला. या संधीचा फायदा घेत २६ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा गोल झळकावत ४-० ने आघाडी घेतली. पहिल्या सत्रात ४-० ने आघाडी घेतल्याने भारतीय संघ दडपणाखाली आला. दुस-या सत्रातही हे दडपण कायम राहिले.

दुस-या सत्रात भारतीय संघाला गोल करण्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. भारताच्या दिलप्रीत सिंहने ३४ व्या मिनिटाला गोल झळकावत ४-१ अशा स्थितीत आणला. मात्र, त्यानंतर भारतीय संघाला एकही गोल करता आला नाही. ४० व्या आणि ४२ व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाने सलग दोन गोल झळकावले आणि ६-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५१ व्या मिनिटाला आणखी एक गोल करत भारताला ७-१ ने पराभूत केले.

पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला ३-२ ने पराभूत केले होते. त्यानंतर दुस-या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून ७-१ ने पराभव सहन करावा लागला. आता भारताचे पुढील सामने स्पेन, अर्जेंटिना, जपान या संघासोबत आहेत. आता स्पर्धेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारताला हे तिन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
सिंधू, मेरी कोम, बत्राकडून आशा

टोकियो ऑलिम्पिकमधील रविवारचा दिवस भारतासाठी निराशाजनक ठरला. एकीकडे नेमबाजी, हॉकी, जलतरण स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंनी निराशा केली. मात्र, दुसरीकडे भारतीय बॉक्सर मेरी कोम, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि टेबल टेनिसपटू मनिका बत्राने विजय मिळवत पदकाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. त्यामुळे त्यांची पुढच्या टप्प्यात कामगिरी कशी होते, यावर सर्व अवलंबून आहे.

१९ सप्टेंबरला रंगणार मुंबई-चेन्नईमध्ये लढत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या