18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडा‘कॉमनवेल्थ गेम्स २०२२’ स्पर्धेतून भारतीय हॉकी संघाची माघार

‘कॉमनवेल्थ गेम्स २०२२’ स्पर्धेतून भारतीय हॉकी संघाची माघार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय हॉकी चाहत्यांसाठी मंगळवारी संध्याकाळी एक वाईट बातमी समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचल्यानंतर भारतीय हॉकी संघाने पुढील वर्षी बर्मिंगहॅम येथे होणा-या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून माघार घेतली आहे.

हॉकी इंडियाने कोविड-१९बद्दलची भीती आणि भारत देशातील नागरिकांच्या प्रति भेदभावपूर्ण क्वारंटाईन नियमांमुळे पुढील वर्षी होणा-या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेतून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला. हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्र निंगोबाम यांनी फेडरेशनचा निर्णय भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांना कळवला आहे.
हॉकी इंडियाने म्हटले आहे की, बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स (२८ जुलै ते ८ ऑगस्ट) आणि हांग्जो आशियाई गेम्स (१० ते २५ सप्टेंबर) मध्ये होणार असून यामध्ये फक्त ३२ दिवसांचे अंतर आहे. त्यामुळे आपल्या खेळाडूंना यूकेमध्ये पाठवण्याचा धोका पत्करायचा नसल्याने व कोरोना व्हायरस महामारीमुळे ब्रिटन सर्वांत प्रभावित देश असल्याने धोका होऊ शकतो.

पॅरिस ऑलिम्पिकमुळे घेतला निर्णय
निंगोबाम यांनी लिहिले, एशियन गेम्स २०२४ ही पॅरिस ऑलिम्पिक गेम्ससाठी एक महाद्वीपीय क्वालिफिकेशन स्पर्धा आहे त्यामुळे आशियाई खेळांचे प्राधान्य लक्षात घेऊन हॉकी इंडिया कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान कोविड -१९ व्हायरसच्या सावटाखाली येऊन खेळाडूंना धोका होऊ शकतो म्हणून आम्ही हा निर्णय घेत आहोत असे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या