31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeक्रीडाभारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

भारतीय संघ ऑस्ट्रेलियात दाखल

एकमत ऑनलाईन

मेलबर्न : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौ-यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे. रवाना झाल्याबरोबर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना आव्हान दिलं आहे. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करणार असाल तर मला त्याची भीती नाही पण तुम्ही करत असलेल्या प्लॅनचा काहीही फायदा होणार नाही, असे म्हणत स्टीव्ह स्मिथने भारतीय बोलर्सला डिवचले आहे.

‘माझ्या जीवनात मी एवढ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केलाय की आता मला कसलीही चिंता वाटत नाही. भारतीय बोलर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल, असे स्टीव्ह स्मिथने म्हटले आहे.

न्यूझीलंडविरुद्ध खेळताना स्टीव्ह स्मिथला नील वॅगनरने ४ वेळा शॉर्ट पीच बॉलवर बळीचा बकरा बनवले. यावर बोलताना स्मिथ म्हणाला, वॅगनर एक वेगळ्या दर्जाचा बॉलर आहे. त्याची पुनरावृत्ती भारतीय बोलर्स करायला गेले तर ते पस्तावतील. त्याच्यासारखी बॉलिंग टाकणे भारतीय बोलर्सला जमणार नाही. तो उत्कृष्ट बॉलर आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजांमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर भारताची जबाबदारी असेल. बुमराह आणि शमीने याअगोदरही स्टीव्ह स्मिथला ब-याचदा आऊट केले आहे. कसोटी मालिकेत बुमराह-शमी-स्मिथ यांच्यात कसा सामना रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

स्वातंत्र्य हवेच; पण स्वैराचार नको!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या