21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeक्रीडाभारतीय संघ निवडीला सुरुवात

भारतीय संघ निवडीला सुरुवात

एकमत ऑनलाईन

मुंबई: आशिया कप स्पर्धा २७ ऑगस्टपासून सुरु होतेय. आशियातील टॉप संघांमध्ये सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे संघ आशिया कप मध्ये उतरणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळणारा आशियाचा प्रत्येक संघ या स्पर्धेत उतरणार आहे. अनेक देशांनी आपले संघ निवडले आहेत.

स्पर्धेत सहभागी होणा-या सर्व संघांना आशियाई क्रिकेट काऊन्सिलकडे ८ ऑगस्टपर्यंत अंतिम संघाची यादी पाठवायची आहे. भारत ८ ऑगस्टला आशिया कपसाठी आपली टीम निवडणार आहे. त्याचं काऊंटडाऊन सुरु झालय.

दोन खेळाडूंचे पुनरागमन निश्चित
आशिया कप मध्ये खेळणारा संघ टीम इंडियाचा टी २० वर्ल्ड कप संघ असेल, असं मानलं जातय. म्हणजे आशिया कप मधून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणा-या टी २० वर्ल्ड कपच चित्र स्पष्ट होईल.

आशिया कप स्पर्धेच्या नियमानुसार, प्रत्येक संघाला आपल्या १५ खेळाडूंची यादी आशिया क्रिकेट काऊन्सिलकडे सोपवायची आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सिलेक्शन कमिटी आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघ निवडू शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या