27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाभारतीय महिला रग्बी खेळाडूवर बंदी

भारतीय महिला रग्बी खेळाडूवर बंदी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य समितीने बिहारची महिला रग्बीपटू अंतिमा कुमारीवर दोन वर्षाची बंदी घातली आहे.

भारतात बहुदा पहिल्यांदाच रग्बी खेळाडूला उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणी बंदीला सामेरे जावे लागणार आहे. अंतिमा कुमारी ही आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी शॉर्टलिस्ट झाली होती. नाडाला तिच्या शरिरात बंदी असलेले टॅमोक्सिफेन द्रव्य आढळले होते.

टॅमोक्सिफेन हार्मोन आणि मेटाबॉलिक मॉड्युलेटर म्हणून ओळखले जाते. जागतिक उत्तेजन द्रव्य विरोधी समितीने २०२१ मध्ये या द्रव्याचा एस ४ अंतर्गत बंदी असलेल्या द्रव्यात समावेश केला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या