24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडादुसरा एकदिवसीय सामना जिंकत भारतीय महिलांनी रचला इतिहास

दुसरा एकदिवसीय सामना जिंकत भारतीय महिलांनी रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

२३ वर्षांत पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये मालिका जिंकली
नवी दिल्ली : भारतीय महिलांनी इंग्लंडच्या महिला संघाला दुस-या एकदिवसीय सामन्यात ८८ धावांनी मात देत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे १९९९ नंतर प्रथमच म्हणजेच २३ वर्षांत पहिल्यांदाच भारतीय महिलांनी इंग्लंडच्या मातीत मालिकाविजय मिळवला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत ३३३ धावांचा डोंगर उभारला.

ज्यानंतर इंग्लंडला २४५ धावांत सर्वबाद करत ८८ धावांनी सामना जिंकला. सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद १४३ धावांची तुफान खेळी केली आहे. मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय महिलांनी इंग्लंड संघाचा सात विकेट्सनी पराभव केला होता.

दुस-या एकदिवसीय सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. पण फलंदाजीला आलेल्या भारतीय महिलांनी इंग्लंडचा हा निर्णयÞ चूकीचा ठरवत अप्रतिम फलंदाजीचे दर्शन घडवले. शेफाली ८ धावा करून बाद झाली असली तरी स्मृती मंधानाने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण कर्णधार हरमनप्रीत कौरने केलेली नाबाद १४३ धावांची खेळी यादगार ठरली. हरलीन देवोलनेही ५८ धावांची खेळी करत भारताची धावसंख्या वाढवण्यात मोलाची कामगिरी केली. या तिघींच्या खेळीच्या जोरावर भारताने ३३४ धावांचे विशाल लक्ष्य इंग्लंडसमोर ठेवले.

इंग्लंडचा ८८ धावांनी पराभव
मैदानात ३३४ धावांचे मोठे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खास झाली नाही. सलामीवीर स्वस्तात तंबूत परतले. अ‍ॅलिस कॅपिसी आणि डॅनियल वॅटने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अ‍ॅलिस ३९ धावा करून बाद झाली.

अ‍ॅमि जोन्सने ३९ धावांची साथ डॅनियलला दिली. चॅरलोट डीननेही ३७ धावा केल्या. पण या सर्वजणी बाद झाल्या, डॅनियलनेही ६५ धावांची एकहाती झुंज दिली, पण अखेर भारताच्या दमदार गोलंदाजीसमोर तिचाही निभाव लागला नाही आणि २४५ धावांत इंग्लंडचा संघ सर्वबाद झाला. ज्यामुळे सामना भारताने ८८ धावांनी जिंकला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या