22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeक्रीडाकॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

कॉमनवेल्थ गेम्ससाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आगामी कॉमनवेल्थ गेम्ससाठी काही महिनेच शिल्लक राहिले आहे. इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये २९ जुलैपासून कॉमनवेल्थ गेम्सना सुरुवात होणार आहे. या खेळांच्या महासंग्रामासाठी भारत सज्ज झाला असून भारताने नुकताच आपला महिला क्रिकेट संघ जाहीर केला आहे. कॉमनवेल्थ खेळांमध्ये महिला क्रिकेट सामने होणार असून यासाठी भारताने आपला संघ नुकताच जाहीर केला आहे.

यावेळी कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर संघाचं नेतृत्त्व करणार असून स्मृती मंधाना उपकर्णधार असणार आहे. भारताने आपल्या 15 सदस्यीय संघाची नुकतीच घोषणा केली आहे. याबाबतची माहिती आयसीसीसह बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटरवरुन दिली आहे.

भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मांधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), एस. मेघना, राजेश्वरी गायकवाड, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणूका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, हरलीन देवोल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या