28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडाभारताचे इंग्लंडसमोर १६९ धावांचे आव्हान

भारताचे इंग्लंडसमोर १६९ धावांचे आव्हान

एकमत ऑनलाईन

अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅडलेड ओव्हल मैदानात टी २० विश्वचषकाचा दुसरा सेमीफायनल सामना सुरु आहे. भारत विरुद्ध इंग्लंड या सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली असून त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी केली आहे. ज्यानंतर किंग कोहली आणि कुंग फू पांड्या यांनी भारताचा डाव सावरत दमदार अशी अर्धशतकं झळकावत १६८ पर्यंत धावसंख्या नेली आहे. ज्यामुळे जिंकण्यासाठी इंग्लंडला आता १६९ धावा करायच्या आहेत.

या अत्यंत महत्त्वाच्या सामन्यात भारताला नाणेफेक गमवावी लागली. ज्यानंतर इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारताला प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात यावे लागले. सलामीवीर केएल राहुल अगदी स्वस्तात ५ धावा करुन तंबूत परतला. तर रोहितने मात्र २७ धावांची खेळी केली, पण तो देखील मोठी खेळी करु शकला नाही आणि भारताला दुसरा झटका बसला. ज्यानंतर कोहली आणि सूर्या आजही दम दाखवतील असे वाटत असताना सूर्यकुमार १४ धावांवर बाद झाला. पण कोहली मात्र एकहाती झुंज देतच होता. पांड्याने त्याला संथगतीने साथ दिली. मग कोहली ५० धावा करुन बाद होताच पांड्याने गिअर अप करत फटेकबाजी सुरु केली. त्याने ३३ चेंडूत ६३ धावा ठोकल्या पण शेवटच्या चेंडूवर तो चूकीने हिटविकेट झाला. ज्यामुळे भारतीय डावाचा अखेरचा चेंडू निर्धाव राहिला. ज्यामुळे भारताने १६८ धावा केल्या असून इंग्लंडला विजयासाठी १६९ धावांची गरज आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या