23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeक्रीडाटोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक; नीरजने भालाफेकीमध्ये रचला इतिहास

टोकयो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक; नीरजने भालाफेकीमध्ये रचला इतिहास

एकमत ऑनलाईन

टोकियो : भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं आज ऐतिहासिक कामगिरी बजावताना अ‍ॅथलेटिक्समधील भारताचा सुवर्ण पदकाचा दुष्काळ संपवला. भालाफेकीच्या अंतिम फेरीत नीरजने पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नातच एवढ्या लांब भाला फेकला की प्रतिस्पर्धींनी सुवर्णपदकाची अपेक्षाच सोडली. २००८ नंतर ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय ठरला.

पहिल्या प्रयत्नात नीरजने ८७.०३ अंतरावर भाला फेकत आघाडी मिळवली. दुसऱ्या प्रयत्नात नीरजने ८७.५८ अंतरावर भाला फेकत पहिल्या प्रयत्नाच्या तुलनेत सुधारणा केली. तिसऱ्या प्रयत्नात नीरजचा भाला ७६.७९ अंतरावर गेला. नीरजचा चौथा प्रयत्न अवैध ठरला. मात्र नीरजने आघाडी कायम राखली. नीरजचा पाचवा प्रयत्नही अवैध ठरला. मात्र बाकी स्पर्धकांची कामगिरी सर्वसाधारण राहिली. त्यामुळे नीरजची आघाडी कायम राहिली. मात्र सहाव्या प्रयत्नात नीरजने ८४.२४ अंतरावर भाला फेकत सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केलं. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

याआधी अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आला होता. त्यामुळे तो ऑटोमॅटिक क्वॉलिफिकेशन नियमांनुसार अंतिम फेरीत दाखल झाला होता. नीरजने पात्रता फेरीत तब्बल ८६.६५ मीटर अंतरावर भाला फेकला होता.

भारताला एथलेटिक्समध्ये याआधी एकदाही ऑलिम्पिक मेडल मिळालेलं नाही. मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांचे ब्रॉन्झ मेडल सेकंदापेक्षाही कमी अंतरानं हुकलं होतं. हा दुष्काळ नीरज यंदा संपवेल अशी देशाला आशा होती, आणि नीरजनेही देशाचं स्वप्न पूर्ण केलं. यापूर्वी एशियन गेम्समध्ये नीरजनं गोल्ड मेडल मिळवलं होतं. टोकयो ऑलिम्पिकमधलं भारताचं हे पहिलंच गोल्ड मेडल आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीसह भारताच्या खात्यात यंदा ७ मेडल झाली आहेत.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांकडून ६ कोटी जाहीर
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नीरज चोप्रा याचं अभिनंदन केलं आहे. हरियाणा सरकारच्या वतीनं 6 कोटी रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. नीरज चोप्राची इच्छा असल्यास त्याला क्लास वन दर्जाची नोकरी देऊ, अशी घोषणा देखील त्यांनी केली आहे.

शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी
नीरज चोप्राचा जन्म हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावातील एका शेतकरी कुटुंबात २४ डिसेंबरला जन्म झाला होता. नीरजनं त्याचं शिक्षण चंदीगढ येथे पूर्ण केलं. २०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या २० वर्षा खालील आयएएएफ जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. यानंतर नीरज चोप्राची इंडियन आर्मीत ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती.

बजरंग पुनियाला कांस्यपदक!

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या