30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home क्रीडा भारताचा ऐतिहासिक विजय

भारताचा ऐतिहासिक विजय

एकमत ऑनलाईन

चेन्नई : चेन्नईवर खेळवला गेलेला हा सामना सर्वांच्या लक्षात राहील तो आर. अश्विनच्या अष्टपैलू कामगिरीमुळे. पहिल्या डावात रोहित शर्माने शतक झळकावून टीम इंडियाचा डाव सावरला. त्यानंतर अश्विनने पाच विकेट्स घेत इंग्लंडला पराभवाच्या दिशेने ढकलले. त्यानंतर दुस-या डावात टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतले असताना अश्विनने कर्णधार विराट कोहलीसह दमदार भागीदारी केली. विराटनंतर अश्विनने इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करताना शतक झळकावले. शतक, ८ विकेट्स घेणा-या आर. अश्विनला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. पण, टीम इंडियाच्या या मोठ्या विजयानंतरही अश्विन एका पराक्रमाला मुकला.

इंग्लंडला ४८२ धावांचे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा संपूर्ण संघ १६४ धावांत तंबूत परतला. दुस-या डावात अक्षर पटेलने पाच विकेट्स घेत पदार्पणाचा सामना गाजवला. अक्षर पटेलने ६० धावांत पाच विकेट्स घेतल्या. आर अश्विनने ५३ धावांत ३, तर कुलदीप यादवने २५ धावांत २ विकेट्स घेत विजयात मोठा हातभार लावला. कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा अक्षर हा ९वा भारतीय गोलंदाज ठरला. यापूर्वी मोहम्मद निस्सार (१९३२), वामन कुमार (१९६१), सय्यद आबीद अली (१९६७), दिलीप दोशी (१९७९), नरेंद्र हिरवानी (१९८८), अमित मिश्रा (२००८), आर. अश्विन (२०११), मोहम्मद शमी (२०१३) यांनी असा पराक्रम केला आहे. सामन्याचा तिसरा दिवस गाजवला तो आर. अश्विनने. दमदार फटकेबाजी करताना त्याने शतक झळकावून थेट इयान बॉथम, कपिल देव आदी दिग्गजांच्या पंक्तीत स्थान पटकावले होते. त्याने महेंद्रसिंग धोनीचाही मोठा विक्रम मोडला.

त्यामुळे कसोटीच्या चौथ्या दिवशी त्याला आणखी एक विक्रम खुणावत होता. त्याला एकाच कसोटीत शतक अन् १० विकेट्स असा आगळावेगळा विक्रम करण्याची संधी होती, परंतु अक्षर पटेलने पाच विकेट्स घेत ती हिरावून घेतली. तरीही अश्विनने एकाच सामन्यात शतक अन् ८ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम दुस-यांदा हा पराक्रम केला आणि अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय आहे. सध्या सक्रिय असलेल्या खेळाडूंमध्ये कसोटीत सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच ठरलेला अश्विन पाचव्या स्थानी आहे. स्टीव्हन स्मिथ (१२), जो रूट (११), स्टुअर्ट ब्रॉड (१०), बेन स्टोक्स/केन विलियम्सन/विराट कोहली (९), आर. अश्विन (८), रॉस टेलर/जेम्स अँडरसन (८) असा क्रम येतो.

‘श्री गुरुदत्त’च्या ४ शिक्षकांना झाली कोरोनाची लागण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या