21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाश्रीलंकेविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विजय

श्रीलंकेविरुद्ध भारताचा ऐतिहासिक विजय

एकमत ऑनलाईन

कोलंबो : भारतीय संघाने श्रीलंकेला दुस-या वनडे सामन्यात पराभूत करत इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जो पराक्रम केला, तो आतापर्यंत क्रिकेट विश्वात कोणालाही करता आलेला नाही. भारतीय संघाने या सामन्यात विजयासह मालिका तर जिंकलीच. पण आतापर्यंत वनडे सामन्यात एखाद्या संघाला सर्वात जास्त वेळा पराभूत करण्याची किमया भारतीय संघाने साधली आहे. कारण भारतीय संघाने श्रीलंकेवर सर्वाधिकवेळा विजय मिळवला आहे.

यापूर्वी हा विक्रम पाकिस्तान आणइ ऑस्ट्रेलिया यांच्या नावावर होता. आतापर्यंत पाकिस्तानने श्रीलंकेला वनडे क्रिकेटमध्ये ९२ वेळा पराभूत केले आहे. गेल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला पराभूत करत या विक्रमाशी बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक ९२ वेळा न्यूझीलंडला वनडे क्रिकेटमध्ये पराभूत केले आहे. पण भारताने आता या दोघांचा विक्रम मोडीत काढला आणि ९३ वेळा श्रीलंकेवर विजय मिळवण्याची किमया साधली आहे. त्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या संघावर सर्वात जास्त विजय मिळवण्याचा मान आता भारतीय संघाने पटकावला आहे.

श्रीलंकेने या सामन्यात भातीय संघापुढे विजयासाठी २७६ धावांचे आव्हान ठेवले होते. पण या आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. पण दीपक चहरने अर्धशतक झळकावत भारताला सामना जिंकवून दिला. भारतीय संघ हा सामना हरणार, असे वाटत होते. पण चहरच्या अर्धशतकाने संघात संजीवनी आणली. संघाला विजय मिळवून देण्यात त्याने सिंहाचा वाटा उचलला. या विजयासाह भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. चहरने या सामन्यात सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ६९ धावा फटकावल्या आणि भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चहरचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे. चहरने या सामन्यात फलंदाजीबरोबर चांगली गोलंदाजीही केली. त्यामुळ दीपक चहरला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

ओबीसींची स्वतंत्र जनगणना नाही?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या