23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeक्रीडाटी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात

टी-२० वर्ल्डकपसाठी भारताचे यजमानपद धोक्यात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: भारतात या वर्षी आयसीसी टी-२० वर्ल्डकपचे आयोजन होणार आहे. त्या आधी बीसीसीआयला आयपीएल २०२१च्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला टी-२० वर्ल्डकपचे यशस्वी आयोजन करू शकतो हे दाखवण्याची संधी होती. पण आयपीएलमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर बीसीसीआयची निराशा झाली आहे. परिणामी भारताचे टी-२० वर्ल्डकपचे यजमानपद धोक्यात आले आहे.

भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आयपीएलचे आयोजन सुरू होते. पण थेट बायो बबलमधील खेळाडूंना करोना झाल्याने बीसीसीआयला ही स्पर्धा स्थगित करण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला. या स्थगितीमुळे बीसीसीआयला मोठा धक्का बसला आहे. कारण यावर्षाच्या अखेरीस होणाºया टी-२० वर्ल्डकपवर त्याचा परिणाम होऊ शकतो. आयपीएलचा बाबो बबल फुटल्याने आणि कोरोनाची तिसरी लाट नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता असल्याने ही स्पर्धा भारतात होण्याऐवजी युएईमध्ये होऊ शकते. यासंदर्भातील अंतिम निर्णय येत्या काही महिन्यात घेतला जाऊ शकतो.

वर्ल्डकप संदर्भात बीसीसीआयच्या अधिकाºयांनी काही दिवसांपुर्वी केंद्र सरकारमधील मंत्र्यांशी चर्चा केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. चर्चेत ही स्पर्धा युएईमध्ये घेण्यासंदर्भात सहमती झाली नाही. मात्र देशातील ९ शहरांमध्ये घेण्याचा बीसीसीआय विचार करत आहे. पण या ठिकाणांची अद्याप निवड झालेली नाही, असे समजते आहे.

आयसीसी युएईत स्पर्धा घेण्याच्या बाजूने
चारच आठवड्यात आयपीएल स्थगित करण्याची वेळ आल्याने भारतात आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी सुरक्षित वातावरण नसल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात नोव्हेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे बीसीसीआय यजमानपद गमवण्याची शक्यता आहे. ही स्पर्धा युएईमध्ये होण्याबाबत आयसीसी विचार करत असल्याचे वृत्त आले होते.

रेल्वेमध्ये ‘मेड इन इंडिया’चे नवे इंजिन; १२००० अश्वशक्­तीच्या वॅग १२ बीचा समावेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या