35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home क्रीडा भारताचा ‘अजिंक्य’ विजय!

भारताचा ‘अजिंक्य’ विजय!

एकमत ऑनलाईन

गाबा : गाबा च्या मैदानावरील ऑस्ट्रेलियाचा अंजिक्य विजयरथ रोखत भारताने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (९१), अनुभवी चेतेश्वर पुजारा (५६) आणि तुफानी ऋषभ पंत (८५) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने चौथ्या कसोटी सामन्यात तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या विजयासाह भारताने बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ ने जिंकली आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील दारुण पराभवानंतर भारतीय संघाने फिनिक्स पक्षाप्रमाणे कसोटी मालिकेवर नाव कोरले आहे. पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुस-या कसोटी सामन्यात भारताने ८ गड्याने विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावा केल्या आणि भारताने प्रत्युत्तरात ३३६ धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ३३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. भारतीय संघानं शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर ३२८ धावांचे कठीण आव्हान पार केले आहे.

अखेरच्या पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर रोहित शर्माने आपली विकेट फेकली. त्यानंतर शुबमन आणि पुजारा यांनी संयमी फलंदाजी करत ११४ धावांची भागिदारी केली. गिलं ९१ धावांवर बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि पुजारा यांनी धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजिंक्य रहाणे २४ धावांवर बाद झाला. अजिंक्य राहणेनंतर पुजाराही ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषभ पंतने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. पंतने मयांकसोबत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोक्याच्या क्षणी मयांकने (९) आपली विकेट फेकली. मयांकनंतर सुंदरनं झटपट काढल्या. मात्र विजयाच्या समीप पोहचल्यानंतर सुंदर(२२ ) आणि शार्दुल ठाकूर (२) यांनी विकेट फेकली. मात्र ऋषभ पंतने ८९ धावांची खेळी करत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

३२ वर्षानंतर गाबावर ऑस्ट्रेलियाचा पराभव
ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या मैदानावर मागील ३२ वर्षांपासून अजिंक्य असणा-या ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव भारताने चाखायला लावली आहे. धावांचा यशस्वी पाठलाग करताना चौथ्या डावांत गाबाच्या या मैदानावर भारतीय संघाने नवीन विक्रम प्रस्थापीत केला आहे. याआधी २३६ ही सर्वोत्तम धावसंख्या होती. भारताने हा विक्रम मोडीत काढला.

रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघ अजिंक्यच
मराठमोळया अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाला आतापर्यंत एकदाही पराभव पाहावा लागला नाही. अजिंक्य रहाणेने २०१८ मध्ये अफगानिस्तान विरोधात पहिल्यांदा भारतीय संघाचे नेतृत्व केले होते़ त्यानंतर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात एका सामन्यात भारताला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियात विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. रहाणेच्या नेतृत्वातील पाचही सामन्यात भारतीय संघ अजिंक्य आहे.

मंगळवारपासून आठवड्यातील चार दिवस कोरोना लसीकरण !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या