24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाटी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय

टी-२० मध्ये भारताचा दणदणीत विजय

एकमत ऑनलाईन

कॅनबेरा : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आणि ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारताकडून फलंदाजीत रविंद्र जडेजाने तर गोलंदाजीत त्याच्या जागेवर खेळण्यास आलेल्या युजवेंद्र चहरने केलेल्या शानदार कामगिरी केली आणि विजय मिळून दिला.

भारताने दिलेल्या १६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शानदार सुरूवात केली. कर्णधार फिंच आणि शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागिदारी केली. बदली खेळाडू म्हणून रविंद्र जडेजाच्या जागी संघात आलेल्या युजवेंद्र चहलने फिंचला बाद केले. हार्दिक पांड्याने शानदार कॅच घेतला. त्यानंतर धोकादायक स्टीव्ह स्मिथला १२ धावांवर बाद करून भारताच्या वाटेतील मोठा अडथळा दूर केला. संजू सॅमसनने त्याचा सुपर कॅच घेतला. त्यानंतर स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलला टी नटराजनने माघारी पाठवले. मॅक्सवेल २ धावा करून बाद झाला.

ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ७० अशी असताना डार्सी शॉर्ट आणि हेनरिकेस यांनी ऑस्ट्रेलियाला शतक पूर्ण करून दिले. ही जोडी डोकेदुखी ठरले असे वाटत असताना नटराजनने शॉर्टला ३४ धावांवर बाद करून मोक्याच्या क्षणी विकेट मिळून दिली. त्यानंतर चहलने पुन्हा एकदा कमाल केली. गुगली चेंडूवर मॅथ्यू वेडची विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला. दीपक चाहरने हेनरिकेसची विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या अखेरच्या नियमत फलंदाजाला माघारी पाठवले.
त्याआधी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात केएल राहुल आणि शिखर धवन यांनी केली. पण ऑस्ट्रेलिया दौ-यात शिखर पुन्हा एकदा अपयशी ठरला. शिखर सहा चेंडूत फक्त १ धाव करू शकला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. तो ९ धावाकरून माघारी परतला.

विराटच्या जागी आलेल्या संजू सॅमसनला मोठी संधी होती. त्याने राहुल सोबत काही फटकेबाजी केली. पण २३ धावांवर तो बाद झाला. सॅमसनच्या जागी आलेल्या मनिष पांडेने निराश केले. तो दोन धावा करून बाद झाला. दरम्यान केएल राहुलने ३७ चेंडू ५० धावा केल्या. पण धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात राहुल ५१ धावांवर बाद झाला.

राहुल बाद झाल्यानंतर हार्दिक आणि जडेजा तिस-या वनेड सामन्याप्रमाणे मोठी धावसंख्या उभी करून देतील असे वाटले होते. पण फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हार्दिकने विकेट गमावली. अखेरच्या षटकात वॉशिंग्टन सुंदर बाद झाला. जडेजाने फक्त २३ चेंडूत १ षटकार आणि ५ चौकारांसह नाबाद ४४ धावा केल्या.

बँकेच्या प्रमाणित संकेतस्थळालाच भेट द्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या