24.6 C
Latur
Sunday, October 24, 2021
Homeक्रीडाऑस्ट्रेलियाशी भारताची रणनीती; द्रविड-कुंबळेने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र

ऑस्ट्रेलियाशी भारताची रणनीती; द्रविड-कुंबळेने भारतीय संघाला दिला गुरुमंत्र

एकमत ऑनलाईन

सिडनी : भारत-ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून ऍडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेत भारतीय संघाची खरी परीक्षा असणार आहे. भारताच्या काही माजी खेळाडूंनी ऑस्ट्रेलियात कशी रणनीती असावी याबाबतचे सल्लेही दिले आहेत. यातच आता अनिल कुंबळे आणि राहुल द्रविड या दिग्गजांनीही भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी गुरुमंत्र दिला आहे. या दोन्ही दिग्गजांची मतं वेगवेगळी असली तरी यातून भारतीय संघाला विजयाची गुरुकिल्ली नक्कीच मिळेल.

कुंबळेचा सल्ला
कसोटी मालिकेतील पहिल्याच लढतीत भारताने वर्चस्व गाजवणे गरजेचे आहे. कोहली ही एकमेव कसोटीच खेळणार असल्याने मायदेशी परतण्यापूर्वी तो संघाला कशा प्रकारे दिशा दाखवतो, हे महत्त्वपूर्ण ठरेल. दोन वर्षांपूर्वीसुद्धा भारताने पहिली कसोटी जिंकून त्यानंतर मालिकेत २-१ असे यश संपादन केले. त्यावेळच्या तुलनेत आताचा ऑस्ट्रेलियन संघ अधिक भक्कम असल्याने भारताने पहिला सामना किमान अनिर्णीत राखणेदेखील मोठी गोष्ट ठरेल. त्यामुळे हा सामना जिंकून भारताने उर्वरित मालिकेसाठी पायाभरणी करावी.

द्रविडने काय दिला गुरुमंत्र?
द्रविड म्हणाला की, या कसोटी मालिकेसाठी पुजाराप्रमाणे मैदानावर स्थिरावून संयमाने फलंदाजी केली पाहिजे. त्यावेळी आपला विजय सुकर होईल. गेल्या दौ-यात पुजारानं संयमी फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला होता.

मैनपुरीत सैराटची पुनरावृत्ती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या