22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeक्रीडापहिल्या एक दिवशीय सामन्यात भारताचा विजय

पहिल्या एक दिवशीय सामन्यात भारताचा विजय

एकमत ऑनलाईन

पोर्ट ऑफ स्पेन : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धचा पहिला वनडे सामना अवघ्या ३ धावांनी जिंकला. या विजयाबरोबरच भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १ -० अशी आघाडी घेतली. भारताकडून कर्णधार शिखर धवनने दमदार फलंदाजी करत ९७ धावांची खेळी केली. त्याचे शतक अवघ्या तीन धावांनी हुकले. मात्र या विजयानंतर देखील शिखर धवन निराश आहे.

भारताने वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे आव्हान ठवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजकडून कायल मायेर्स आणि ब्रँडन किंग यांनी अर्धशतकी खेळी केली. मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर पुन्हा वर्चस्व मिळवले. अखेर भारताने पहिला सामना ३ धावांनी जिंकला. या सामन्याचा सामनावीर म्हणून९७ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनची निवड करण्यात आली.

दरम्यान, सामन्यानंतर झालेल्या कार्यक्रमात शिखर धवन म्हणाला की, शतक साजरे करता आले नाही यामुळे मी निराश आहे. मात्र एकूण हा एक सांघिक प्रयत्न होता. आम्ही एक चांगली धावसंख्या उभारली होती. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या