16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeक्रीडारूममध्ये अनोळखी चाहत्याची घुसखोरी ; कोहली भडकला

रूममध्ये अनोळखी चाहत्याची घुसखोरी ; कोहली भडकला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषक जिंकण्यासाठी टीम इंडिया सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण ऑस्ट्रेलियात हॉटेलमध्ये भारतीय खेळाडू सुरक्षित नाहीत. मोठी बातमी म्हणजे एका अनोळखी चाहत्याने पर्थमध्ये विराट कोहलीच्या खोलीत घुसून त्याच्या खोलीचा व्हिडिओ बनवला आहे.

विराट कोहलीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत भयानक म्हटले आहे. मोठी गोष्ट म्हणजे ही घटना घडली तेव्हा विराट कोहली तिथे उपस्थित नव्हता.

या घटनेनंतर विराट कोहली खूपच विचलित झाला आहे. विराट कोहलीने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिले की, मला समजले आहे की चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदित आहेत आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि मी नेहमीच त्याचे कौतुक केले आहे.

जर मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर मी कुठे अपेक्षा करू शकतो? मी या प्रकारची कृती आणि माझ्या गोपनीयतेचे उल्लंघन याशी सहमत नाही. मला ते मान्य नाही. कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजनाची वस्तू मानू नका.

वास्तविक भारतीय क्रिकेट संघ पर्थमध्ये असून हा व्हिडिओ पर्थमधील हॉटेलमधील असल्याचे मानले जात आहे. आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ चा गट-2 सामना ३० ऑक्टोबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या