30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeक्रीडाआयपीएल २०२१ आजपासून; मुंबई-बंगळुरूची टक्कर

आयपीएल २०२१ आजपासून; मुंबई-बंगळुरूची टक्कर

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगातली सगळ्यात मोठी टी-२० लीग असलेली आयपीएल सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. शुक्रवार, ९ एप्रिलपासून स्पर्धेला सुरुवात होईल. यंदाच्या वर्षी पहिला सामना गतविजेती मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात असणार आहे. पाचवेळा चॅम्पियन राहिलेली मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासात कायमच आरसीबीला भारी पडली आहे. आतापर्यंत या दोन्ही टीममध्ये २९ सामने झाले, यापैकी १९ वेळा मुंबईचा तर १० वेळा बंगळुरूचा विजय झाला.

लागोपाठ दुस-या वर्षी कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांना टीव्ही आणि मोबाईलवरच सगळे सामने पाहावे लागणार आहेत. यावेळी आयपीएलचे सामने चेन्नई, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, कोलकाता आणि दिल्ली या ६ ठिकाणी होणार आहेत. तसेच कोणतीही टीम त्यांच्या घरच्या मैदानात खेळणार नाही.

किती वाजता सुरू होणार सामना?
आयपीएल २०२१ ची पहिली मॅच भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल, तर टॉस ७ वाजता होईल. मुंबई आणि बंगळुरू यांच्यातला पहिला सामना ९ एप्रिल रोजी चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियममध्ये होईल. आयपीएल सामन्याचे प्रसारण स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर होणार आहे. याशिवाय मॅचचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिज्नीहॉटस्टारवर पाहता येईल.

बंगळुरूची संपूर्ण टीम
विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, यझुवेंद्र चहल, देवदत्त पडिक्कल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अ‍ॅडम झम्पा, शाहबाज अहमद, फिन एलेन, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, के. एस. भरत, काइल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन

मुंबईची संपूर्ण टीम
रोहित शर्मा, आदित्य तरे, अनमोलप्रीत सिंग, धवल कुलकर्णी, हार्दिक पांड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, क्विंटन डिकॉक, राहुल चहर, सूर्यकुमार यादव, ट्रेन्ट बोल्ट, क्रिस लिन, सौरभ तिवारी, मोहसिन खान, अ‍ॅडम मिल्ने, नॅथन कुल्टर नाईल, पीयुष चावला, मार्को जेन्सन, युद्धवीर सिंग, जेम्स नीशम, अर्जुन तेंडुलकर.

लातूर जिल्हा प्रशासनाकडून केल्या जाणा-या कोरोना प्रतिबंधाच्या उपाय योजनांबाबत केंद्रीय पथक समाधानी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या