25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडाआयपीएल इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त कमाई करते : सौरव गांगुली

आयपीएल इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त कमाई करते : सौरव गांगुली

एकमत ऑनलाईन

मुंबई: आयपीएल ही जगातील सर्वात जास्त पाहिली जाणारी लोक प्रिय लीग आहे. अनेक क्रिकेटपटूंनी आयपीएलमध्ये खेळून आपली कारकीर्द घडवली आहे. लवकरच आयपीएल २०२३ ते २०२७ च्या मीडिया हक्कांची घोषणा केली जाईल आणि त्यानंतर ही लीग जगातील दुसरी सर्वात मोठी स्पोर्ट्स लीग बनेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली आनंदी झाले आहेत.

एका इव्हेंटमध्ये बोलताना सौरव गांगुली म्हणाला, मी हा खेळ विकसित होताना पाहिला आहे. जिथे खेळाडूंनी काही हजारांची कमाई केली आहे आणि आता त्यांच्यात करोडोंची कमाई करण्याची क्षमता दाखवत आहे. हा खेळ देशातील चाहत्यांनी तयार केलेल्या बीसीसीआयद्वारे चालवला जातो. हा खेळ आजून भरपूर वाढत जाणार आहे. आयपीएल मधून इंग्लिश प्रीमियर लीगपेक्षा जास्त कमाई होते. मला अभिमान वाटतो की मला आवडणारा खेळ मजबूत तयार झाला आहे.

आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या दोन नवीन संघांच्या आगमनाने लीग खूप मोठी झाली. आता सामन्यांची संख्या देखील ७४ झाली आहे. इतकेच नाही तर एका हंगामासाठी ९४ सामने आयोजित करण्याची बीसीसीआयची योजना आहे. पुढील पाच वर्षांसाठी प्रसारमाध्यमांचे हक्क विकण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यामुळे बीसीसीआयला मोठी कमाई होणार आहे. जरी आयपीएलचे सर्व हक्क मूळ किमतीत विकले गेले तरी बीसीसीआयला एका सामन्यासाठी सुमारे ९४ कोटी रुपये मिळू शकतात.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या