24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडाआयपीएल पुन्हा ‘होम-अवे’ फॉरमॅटमध्ये होणार : गांगुली

आयपीएल पुन्हा ‘होम-अवे’ फॉरमॅटमध्ये होणार : गांगुली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयपीएलचे स्वरूप पुढील वर्षीपासून पुन्हा बदलणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती दिली. पुढील वर्षापासून म्हणजेच २०२३ च्या सीझनपासून आयपीएल कोविड-१९ पूर्वीच्या जुन्या फॉर्मेटमध्ये परत येणार आहे.

२०२० मध्ये यूएई, दुबई, शारजा आणि अबू धाबी या तीन ठिकाणी रिकाम्या स्टेडियममध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. २०२१ मध्ये ही टी-२० स्पर्धा दिल्ली, अहमदाबाद, मुंबई आणि चेन्नई या चार ठिकाणी आयोजित करण्यात आली. आता महामारी नियंत्रणात आहे. त्यामुळे ही लीग घरच्या मैदानावर आणि विरोधी संघाच्या मैदानावर जुन्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

सहभागी १० संघ त्यांच्या घरच्या मैदानावर आपापले सामने खेळतील. बीसीसीआयने या संदर्भातील पत्र राज्य संघटनांना पाठवले आहे. २०२० नंतर प्रथमच बीसीसीआय आपला संपूर्ण देशांतर्गत हंगाम आयोजित करत आहे.

याशिवाय गांगुलीने महिला आयपीएलबाबतही भूमिका स्पष्ट केली. गांगुली म्हणाले की, बीसीसीआय सध्या महिला आयपीएल आयोजित करण्यावर काम करत आहे. त्याचा पहिला हंगाम पुढील वर्षीच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. महिलांच्या आयपीएल व्यतिरिक्त बीसीसीआय १५ वर्षांखालील मुलींची एकदिवसीय स्पर्धा देखील आयोजित करणार आहे. ही स्पर्धा २६ डिसेंबर ते १२ जानेवारी या कालावधीत बंगळुरू, रांची, राजकोट, इंदूर, रायपूर व पुणे येथे खेळवल्या जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या