32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeक्रीडाआयपीएलचे वेळापत्रक जाहीर; ९ एप्रिल पासून रंगणार थरार

आयपीएलचे वेळापत्रक जाहीर; ९ एप्रिल पासून रंगणार थरार

एकमत ऑनलाईन

मुंबई : बहुप्रतिक्षित आयपीएलच्या १४ व्या मोसमाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. या मोसमाचे आयोजन भारतात करण्यात आले आहे. १४ व्या हंगामाची सुरुवात ९ एप्रिलपासून होणार आहे. या १४ व्या मोसमाचा थरार एकूण ५१ दिवस रंगणार आहे. ९ एप्रिल ते ३० मे पर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. या मोसमातील सलामीचा सामना गत विजेच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

एकूण ११डबल हेडर मॅच
या पर्वात एकूण ११ डबल हेडर मॅच खेळवण्यात येणार आहेत. डबल हेडर म्हणजेच एकाच दिवसात २ सामने. साधारणपणे हे डबल हेडर सामने शनिवार आणि रविवारी खेळवण्यात येतात. डबल हेडरमधील पहिल्या सामन्याला दुपारी ३.३० वाजता सुरुवात होणार आहे. तर दिवसातील दुसºया सामना संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार आहे.

आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी टीम आहे. मुंबईने एकूण १३ मोसमांपैकी ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबईने २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० अशा एकूण ५ पर्वांमध्ये आयपीएल ट्रॉफी उंचावली आहे. मुंबईच्या गोटात यावेळेस आणखी अनुभवी खेळाडू दाखल झाले आहेत. यामुळे मुंबईकडून यावेळेसही विजेतेपदाची हॅटट्रिक पूर्ण करणार का, याकडे मुंबईच्या चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

 

ग्रामीण भागातील रणरागिनी उपसरपंच पटणे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या