22 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeक्रीडाआयपीएलचा दस-याला अंतिम सामना; नव्या तारखा जाहीर

आयपीएलचा दस-याला अंतिम सामना; नव्या तारखा जाहीर

एकमत ऑनलाईन

मुंबई : जगभरातील क्रिकेट स्पर्धांमध्ये सर्वात चूरशीची आणि बिग बजेट इंडियन प्रिमीयर लीग यंदा कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे स्थगित करण्यात आली होती. २९ सामने झालेल्या आयपीएलचे उर्वरीत ३१ सामने युएईत घेणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने दिली. मात्र नेमकी तारीख अद्यापर्यंत समोर आली नव्हती. अखेर एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार आयपीएलला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर अंतिम सामना १५ ऑक्टोबरला खेळवला जाईल. विशेष म्हणजे या दिवशी दसरा असल्याने भारतीयांसाठी हा दिवस विशेष असतो. त्यामुळे याच दिवशी अंतिम सामना खेळवण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असणार आहे.

बीसीसीआयच्या एका अधिका-याने एएनआयला दिलेल्या माहितीत सांगितले की, बीसीसीआय आणि युएई क्रिकेट बोर्ड यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे बीसीसीआयला दुबईत आयपीएल चांगल्यारित्या पार पडेल असा विश्वास आहे. तसेच, परदेशी खेळाडूंच्या आयपीएलमध्ये खेळण्याच्या प्रश्नावर संबधित अधिका-याने बीसीसीआयची खेळाडू आणि त्यांच्या बोर्डांसोबत चर्चा सुरु आहे, असे उत्तर दिले.

परदेशी खेळाडूंचा मुद्दा महत्त्वाचा
संपूर्ण आयपीएलच्या नियोजनात परदेशी खेळाडू आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा मुख्य असणार आहे. सर्व खेळाडूंना एका बायो बबलमधून दुस-या बायो बबलमध्ये सुरक्षितपणे घेऊन जाण्याच्या मुद्यावर अधिक चर्चा होईल. त्यातच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने त्यांचे खेळाडू टी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेआधी आयपीएलमध्ये खेळणार नसल्याचे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे इतर क्रिकेट बोर्डांची काय भूमिका आहे, यावर ही चर्चा करण्यात येईल.

आयपीएलमधील संघाना बीसीसीआयवर विश्वास
आयपीएलमधील संघाना बीसीसीआय स्पर्धेचे योग्यप्रकारे नियोजन करेल आणि परदेशी खेळाडूंना स्पर्धेसाठी नक्की आणेल असा विश्वास आहे. याबाबत बोलताना एका संघाचा अधिकारी म्हणाला की, बीसीसीआयच्या विशेष बैठकीनंतर आम्हाला कळाले की बीसीसीआय परदेशी खेळाडूंशी चर्चा करत आहे. त्याच्या उपलब्धतेसाठी प्रयत्न करत आहे. आम्हाला काही खेळाडूंची कमी भासू शकते, त्याबाबत लक्ष देण्याची गरज आहे.

इव्हर्मेक्टिन, डॉक्सिसाईक्लिन औषधांचा वापर थांबवा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या