25.9 C
Latur
Wednesday, October 27, 2021
Homeक्रीडाआयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेने थैमान घातला असताना इंडियन प्रिमीअर लीग(आयपीएल)लाही त्याचा फटका बसला असून, स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून मंगळवार दि़ ४ मे रोजी घेण्यात आला. सोमवारी कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर बंगळुरुसोबत होणारा सामना पुढे ढकलावा लागला. दरम्यान चेन्नईच्याही तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर मंगळवारी हैदराबादचा वृद्धिमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करत असल्याचे जाहीर केले आहे.

सध्याच्या परिस्थितीत आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे, पूर्ण रद्द केलेली नाही. काही दिवसांनंतर सर्व संबंधितांशी चर्चा करून, उर्वरित स्पर्धा घेता येईल का; कुठे व कशी घेता येईल आदीची चाचपणी केली जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. बायो-बबलमध्येही कोरोनाने घुसखोरी केल्याने आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यातच बीसीसीआय सर्व सामने मुंबईत खेळण्याची तयारी करत होते. मात्र यादरम्यान हैदराबादच्या वृद्धिमान साहा याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. हैदराबाद आणि मुंबईमध्ये आज दिल्लीत सामना होणार होता. खेळाडूंनाही कोरोनाची लागण होत असल्याने अखेर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बीसीसीआय स्पर्धा मुंबईत हलवण्याच्या तयारीत होते
बीसीसीआय आयपीएलचे उर्वरित सर्व सामने मुंबईत शिफ्ट करण्याचा विचार करत होते. मुंबईतील वानखेडे, डी वाय पाटील आणि ब्रेबॉर्न या तीन मैदानांमध्ये हे सामने खेळवले जाणार होते.

मुंबई उच्च न्यायालयात याचिका
आयपीएलच्या पुढील सामन्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना स्पर्धा रद्द करावी किंवा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका मंगळवारी मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. कोरोना स्थितीमुळे आयपीएल स्पर्धा पुढे रद्द करण्यात यावी किंवा पुढे ढकलावी असा आदेश बीसीसीआयला द्यावा अशा मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच, आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून खेळाडूंसाठी होणा-या संसाधनांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो असे याचिकाकर्त्याने म्हटले होते़

१५ ते २५ मेदरम्यान ओसरणार लाट?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या