24.6 C
Latur
Monday, January 18, 2021
Home क्रीडा IPL2020- नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जची प्रथम गोलंदाजी

IPL2020- नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जची प्रथम गोलंदाजी

एकमत ऑनलाईन

दुबई : आयपीएलच्या तेराव्या सिजनला सुरुवात झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स रंगणार आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून चेन्नईने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. मुंबईच्या संघात क्विंटन डी कॉक, रोहित शर्मा, सूर्य़कुमार यादव, सौरभ तिवारी, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या, कायरन पोलार्ड, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह या 11 जणांचा समावेश करण्यात आला आहे.

चेन्नई सुपर किंग्जमध्येही मुरली विजय, वॉटसन, फाफ डू प्लेसीस, रायुडू, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, रविंद्र जाडेजा, सॅम करन, दीपक चहर, पियुष चावला, लुंगी एन्गीडी हे शिलेदार मैदानावर उतरणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएलचा सीजन 13 पुढे ढकलण्यात आला. दुबईमध्ये यंदाचा सीजन खेळवण्यात येत असून कोरोनाच्या दृष्टीने संपूर्ण काळजी घेण्यात आलीये.

संत एकनाथ महाराज यांच्या नावाने पैठण येथील संतपीठ सुरू करण्यात येणार-उदय सामंत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या