28.5 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeक्रीडान्यूझिलंडविरुद्ध आयर्लंडच्या जोशुआ लिटिलची हॅट्ट्रिक

न्यूझिलंडविरुद्ध आयर्लंडच्या जोशुआ लिटिलची हॅट्ट्रिक

एकमत ऑनलाईन

– टी-२० विश्वचषकात अशी कामगिरी करणारा जोशुआ सहावा गोलंदाज
अ‍ॅडलेड : टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ फेरीतील न्यूझिलंडविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटिलने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. या सामन्यात हॅट्ट्रिक घेऊन जोशुआने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट ली, कागिसो रबाडा आणि वानिंदु हसरंगा यांसारख्या दिग्गज गोलंदाजांच्या यादीत समावेश केला आहे.

यंदाच्या टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा तो दुसरा तर जगातील सहावा गोलंदाज ठरला आहे. यूएईच्या कार्तिक मय्यपनने श्रीलंकेविरुद्ध टी-२० विश्वचषकातील पहिली हॅट्ट्रिक घेतली होती.

न्यूझिलंड आणि आयर्लंड यांच्यात आज टी-२० विश्वचषकातील ३७ वा सामना खेळला गेला. दरम्यान, न्यूझिलंडच्या डावातील १९ व्या षटकात आयर्लंडकडून जोशुआ लिटिल गोलंदाजीसाठी आला. त्याने या षटकात न्यूझिलंडचा कर्णधार केन विल्यम्सन, जेम्स नीशम आणि मिचेल सँटेनरच्या विकेट्स घेऊन यंदाच्या टी-२० विश्वचषकातील दुसरी हॅट्ट्रिक घेतली.

टी-२० विश्वचषकात हॅट्ट्रिक घेणारा सहावा गोलंदाज
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट लीने २००७ च्या टी-२० विश्वचषकात पहिल्यांदा हॅट्ट्रिक घेतली होती. महत्त्वाचे म्हणजे, मागच्या टी-२० विश्वचषकात तीन गोलंदाजांनी हॅट्ट्रिक घेतली. आयर्लंडचा वेगवान गोलंदाज कर्टिस कॅम्पफरने नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केली आहे.

त्यानंतर श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदु हसरंगाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली. यंदाच्या टी-२० विश्वचषकात यूएईच्या कार्तिक मय्यपनने श्रीलंकेविरुद्ध हॅट्ट्रिक घेऊन इतिहास रचला होता. त्यानंतर जोशुआ लिटिलने न्यूझिलंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या