24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeक्रीडाईशान किशनची हनुमान उडी!

ईशान किशनची हनुमान उडी!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-२० मालिकेमध्ये भारतीय सलामीवीर ईशान किशनने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केलीे. तीन सामन्यांमध्ये त्याने दोन अर्धशतके झळकावली. या कामगिरीच्या बळावर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) टी-२० क्रमवारीत ६८ स्थानांची झेप घेतली आहे. आयसीसीच्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत ईशान सध्या सातव्या स्थानावर पोहचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम हा टी-२० आणि एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेत ईशान किशनने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये १६४ धावा केल्या. त्यामुळे तो टी-२० फलंदाजांच्या यादीत पहिल्या १० जणांच्या यादीमध्ये प्रवेश करू शकला. पहिल्या १० फलंदाजांमध्ये किशन हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. त्याच्यापाठोपाठ केएल राहुल १४ व्या स्थानावर आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांची प्रत्येकी एका स्थानाने घसरण झाली असून ते अनुक्रमे १६ व्या आणि १७ व्या स्थानावर आहेत. माजी कर्णधार विराट कोहली दोन स्थानांनी घसरून २१ व्या स्थानावर पोहोचला आहे.

गोलंदाजी क्रमवारीमध्ये वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारची सात स्थानांनी सुधारणा झाली आहे. तो सध्या ११ व्या स्थानावर पोहचला आहे. फिरकीपटू यजुवेंद्र्र चहलने चार स्थानांनी प्रगती करत २६वे स्थान मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूडने टी-२० गोलंदाजीत पुन्हा पहिले स्थान पटकावले. कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे सातव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत. तर, इंग्लंडच्या जो रूटने न्यूझीलंडविरुद्ध सलग दुसरे शतक झळकावून अव्वल स्थान पटकावले. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने कसोटी गोलंदाजी क्रमवारीत तिस-या स्थानावर झेप घेतली. रविचंद्रन अश्विन दुस-या स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत रवींद्र जडेजा आणि अश्विन पहिल्या दोन स्थानांवर टिकून आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या