23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeक्रीडाजसप्रीत बुमराह लवकरच संघात परतणार

जसप्रीत बुमराह लवकरच संघात परतणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणा-या आगामी टी-२० विश्वचषकाला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. यापूर्वी भारतीय संघाला मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरत असून तो लवकरच भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘‘जसप्रीत बुमराहची फिटनेस आता चांगली असून तो दुखापतीतून सावरतोय. टी-२० विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेत जसप्रीत बुमराह संघात सामील होईल, अशी, बीसीसीआयला आशा आहे.

आशिया चषकाला सुरुवात होण्यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या रूपात भारतीय संघाला मोठा धक्का बसला.जसप्रीत बुमराहला पाठदुखीच्या तीव्र दुखापतीमुळे आशिया चषकातून बाहेर पडावे लागले. मात्र, त्यानंतर जसप्रीत बुमराह राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला असून दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करतोय.

लवकरच बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन
जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. जसप्रीत बुमराह आगामी टी-२० विश्वचषकाला मुकण्याची चिंता व्यक्त केली जात होती. परंतु, तो दुखापतीतून सावरत असल्याची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांसह भारतीय संघातही आनंदी वातावरण आहे.

हर्षल पटेलची दुखापतीशी झुंज
जसप्रीत बुमराहव्यतिरिक्त भारताचा स्टार गोलंदाज हर्षल पटेलही दुखापतीने ग्रस्त आहे. ज्यामुळे त्यालाही आशिया चषकात विश्रांती देण्यात आली आहे. बुमराहसह तोही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्या फिटनेसवर काम करत आहे.
महत्त्वाचे म्हणजे, हर्षल पटेलच्या दुखापतीबाबत अद्याप कोणतीही अपडेट समोर आली नाही. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळत आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल तंदुरुस्त झाल्यानंतर आवेश खानला टी-२० विश्वचषक संघातून वगळले जाऊ शकते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या