नवी दिल्ली : २००७ चा टी-२० विश्वचषक भारताला जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणा-या जोगिंदर शर्माने क्रिकेटच्या सर्व फॉर्ममधून निवृत्ती जाहीर केली आहे. जोगिंदरने भारतासाठी एकूण चार टी-२० आणि तेवढेच एकदिवसीय सामने खेळले आहेत.
२००७ चा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर जोगिंदर काही वर्षे आयपीएलही खेळला होता.
जोगिंदर शर्माला हरियाणा राज्य सरकारने टी-२० विश्वचषकातील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल २१ लाखांचे रोख बक्षीसही दिले होते.
यानंतर हरियाणाच्या या क्रिकेटपटूने हरियाणातच पोलिसांत भरती होण्याचा निर्णय घेतला. सध्या जोगिंदर हरियाणामध्ये डीएसपी म्हणून कार्यरत आहे.