24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडा‘ज्युनियर मलिंगा’ पथिराना सीएसके संघात दाखल

‘ज्युनियर मलिंगा’ पथिराना सीएसके संघात दाखल

एकमत ऑनलाईन

मुंबई : आयपीएलमध्ये यंदा चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी विशेष झालेली नाही. सहापैकी एकच सामना त्यांना जिंकता आला. वेगवान गोलंदाज अ‍ॅडम मिल्ने मांसपेशी ताणल्या गेल्याने बाहेर पडला आहे.

प्रमुख गोलंदाज दीपक चहर आधीच बाहेर झाला. मिल्नेऐवजी रवींद्र जडेजाने श्रीलंकेचा युवा वेगवान गोलंदाज मधीशा पथिराना याला संघात घेतले आहे. हा युवा खेळाडू पूर्वीपासून सीएसकेच्या रडारवर होता.२०२१ च्या पर्वात सीएसकेने मिस्ट्री स्पिनर महेश तीक्ष्णा याच्यासोबत पथिराना याला राखीव खेळाडू म्हणून घेतले.
तीक्ष्णाला यंदा लिलावात ७० लाख रुपये देण्यात आले. पथिराना हा २० लाख रुपयांत चार वेळेचा चॅम्पियन सीएसकेसोबत जुळला. १९ वर्षांचा पथिराना याची ओळख ‘ज्युनियर मलिंगा’ अशी आहे. पथिराना हा वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषकात श्रीलंका संघात होता.

चार सामन्यांत त्याने सात बळी घेतले. त्याची शैली मलिंगासारखीच आहे. यॉर्कर हुबेहूब मलिंगासारखाच टाकतो. वरिष्ठ स्तरावर खेळण्याचा मात्र त्याला अनुभव नाही. त्याने आतापर्यंत केवळ एकच लिस्ट अ सामना आणि दोन टी-२० सामने खेळले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या