नवी दिल्ली : आयपीएल २०२२ मध्ये दोन नवीन संघ लखनौ आणि अहमदाबाद पदार्पण करत आहेत. आयपीएल मेगा लिलावापूर्वी लखनौ फ्रेंचायझीने भारतीय सलामीवीर के. एल. राहुल, अनकॅप्ड भारतीय खेळाडू रवी बिश्नोई आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू मार्कस स्टॉइनिस यांना संघात सामील केले आहे.
के.एल. राहुल लखनौ संघाचा कर्णधारही असेल. लखनौ फ्रेंचायझीने के. एल. राहुलला १५ कोटी रुपयांमध्ये सामील केले आहे. त्याचवेळी स्टॉइनिसला ११ कोटी मिळतील. आयपीएलच्या गेल्या दोन मोसमात चांगली कामगिरी करणारा लेगस्पिनर रवी बिश्नोईला ४ कोटी रुपये मिळणार आहेत.