27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeक्रीडाके. एल. राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेलाही मुकणार

के. एल. राहुल वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेलाही मुकणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतीय संघातील एक अव्वल दर्जाचा फलंदाज आणि सलामीवीर के. एल. राहुल मागील काही काळापासून दुखापत, नंतर कोरोनाची बाधा या सर्वामुळे टीम इंडियाबाहेर आहे. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेतही तो संघात नसणार आहे.

कोरोनातून बरा झाल्यानंतरही अशक्तपणामुळे तो अजूनही बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली असून भारतीय टी-२० संघासोबत वेस्ट इंडिजलाही गेलेला नाही.

वेस्ट इंडिजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यासाठी भारतीय टी-२० संघ त्रिनिदाद येथे दाखल झाला आहे. २९ जुलैपासून भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका रंगणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध सध्या सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराहसह वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

मात्र, टी-२० मध्ये हे सर्व खेळाडू मैदानात उतरणार आहेत. पण यामध्ये के. एल. राहुलचे नाव असूनही तो दुखापतीच्या कारणामुळे संघासोबत नसून विश्रांती घेत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या