मुंबई : भारताचा क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी हे रिलेशनशिपमध्ये असून गेल्या अनेक दिवसांपासून दोघांच्या लग्नाची चर्चा रंगली आहे. के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी यांच्या लग्नासाठी दोघांच्या कुटुंबियांची भेटही झाल्याचे म्हटले जात आहे.
के. एल. राहुल पुढच्या महिन्यात पहिल्या आठवड्यात आथियासोबत लग्न करणार असल्याचे म्हटले जात आहे. यासाठी बीसीसीआयकडून त्याने सुटीही मागितली असून त्याच्या सुटीला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.
आथिया शेट्टी बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी असून ती स्वत:ही अभिनेत्री आहे. के. एल. राहुलने बांगलादेश कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयकडे विश्रांतीची मागणी केली आहे. के. एल. राहुलकडे भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधार पदाची जबाबदारी आहे.
के. एल. राहुल श्रीलंकेविरुद्ध भारतात होणा-या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत आणि एकदिवसीय मालिकेत खेळू शकणार नाही. के. एल. राहुल आणि आथिया शेट्टी जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात लग्न करणार असल्याचे समजते.
अभिनेता सुनील शेट्टीने धारावी बँक या वेब सीरिजच्या रिलीज इव्हेंटमध्ये आथिया आणि के. एल. राहुल यांच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. दोघे लवकरच लग्न करतील असे सुनील शेट्टीने म्हटले होते. त्यामुळे आता के. एल. राहुलने ब्रेक घेतल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा होत आहे.