22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeक्रीडाएका झेलबद्दल १६ वर्षांनी कैफने मागितली माफी

एका झेलबद्दल १६ वर्षांनी कैफने मागितली माफी

एकमत ऑनलाईन

कराची : नॅटवेस्ट मालिकेतील अंतिम सामन्यात कैफ-युवराज जोडीने तडफदार खेळ करून सामना जिंकला होता. कैफची ती खेळी सा-यांच्या लक्षात आहे, पण फिल्डिंगमध्ये कैफ शेवटपर्यंत अव्वल होता. मैदानावर त्याने अनेक असे झेल टिपले जे सहसा अशक्य किंवा कठीण वाटतील. पण त्यापैकीच एका झेलबद्दल त्याला १६ वर्षांनी माफी मागावीशी वाटली.

भारतीय संघ २००४ ला पाकिस्तान दौ-यावर गेला होता. त्या दौºयात कराची येथील सामना अटीतटीचा झाला होता. भारताने पाकिस्तानला ३५० धावांचे आव्हान दिले होते. पाकिस्तान विजयापासून केवळ १० धावा दूर असताना कैफने एक अप्रतिम असा झेल टिपला होता. पण हा झेल पकडताना त्याच्याकडून अशी गोष्ट घडली की त्याला त्याबद्दल माफी मागावी लागली.

कैफने तो झेल पकडला तेव्हा सहकारी हेमांग बदानी हा देखील त्याच्याबरोबर झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता. कैफने झेप घेत झेल घेताना कैफचा पाय बदानीला लागला आणि तो थोडा जखमी झाला. कैफने या कॅचचा व्हीडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हीडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने हेमांग बदानीची माफी मागितली.

Read More  राज्यात आजही उच्चांकी 9431 रुग्णांची भर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या