26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home क्रीडा कांगारूंकडे १९७ धावांची आघाडी

कांगारूंकडे १९७ धावांची आघाडी

एकमत ऑनलाईन

सिडनी : तिस-या दिवशी सिडनी कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाने आपले निर्वादित वर्चस्व राखले आहे. दुस-या दिवशी पिछाडीवर पडलेल्या कांगारूंनी तिस-या दिवशी जोरदार प्रतिहल्ला करत सामन्यावर वर्चस्व राखले आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिस-या दिवशी २४४ धावांवर आटोपला. त्यानंतर दुस-या डावात ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावा केल्या आहेत. तिस-या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे १९७ धावांची आघाडी आहे.

दुस-या दिवशी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाने तिस-या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडले. त्यानंतर संयमी पण आक्रमकपणे फलकावर १०३ धावा उभा केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दोन झटके बसले. मात्र, तिस-या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी भारताला आणखी विकेट दिली नाही. तिस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन ४७ तर स्मिथ २९ धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.

दरम्यान, तिस-या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव २४४ धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (५०) आणि शुभमन गिल (५०) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (२६), अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रवींद्र जडेजाने अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जडेजाने नाबाद २८ धावांची खेळी केली.

भारताचे तीन फलंदाज धावबाद
भारतीय फलंदाजांनी हराकिरी केल्यामुळे तिस-या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व मिळवले आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने अफलातून क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन केले. कांगारूंनी भारताच्या तीन फलंदाजांना धावबाद केले़ यामध्ये हनुमा विहारी(४), आर. अश्विन (१०)आणि जसप्रीत बुमरा (००) यांचा समावेश आहे.

पंत-जडेजा दुखापतग्रस्त
पहिल्या डावात फलंदाजी करताना यष्टिरक्षक ऋषभ पंत आणि अष्टपैलू रवींद्र जडेजाला दुखापत झाली आहे. दुस-या डावात क्षेत्ररक्षणासाठी दोघेही मैदानात उतरले नव्हते. जडेजाच्या जागी मयांक अगरवाल आणि पंतच्या जागी वृद्धिमान साहा क्षेत्ररक्षणासाठी उतरले होते. स्कॅन केल्यानंतर पंत-जडेजा यांच्या दुखापतीबाबत समजले. याआधी ईशांत, शमी, के. एल. राहुल आणि उमेश यादव दुखापतीमुळे कसोटी मालिकेला मुकले आहेत.

शत्रूच्या हल्ल्यापेक्षाही आत्महत्यांमुळे अधिक सैनिकांचे मृत्यू

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या